सामान्य माणसाला डोळे असतात, पण लेखकाला दृष्टी असते – प्रा.डॉ.गौरव जेवळीकर
उदगीर (एल.पी.उगीले)
सामान्य माणसाला डोळे असतात पण लेखकाला दृष्टी असते, असे मत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथील लोकप्रशासन विषयाचे विभाग प्रमुख प्रा डॉ. गौरव जेवळीकर यांनी “वाचू आनंदे, ऐकू आनंदे” या उपक्रमात विचार व्यक्त करताना मांडले . प्रसिद्ध साहित्यिक अतुल देऊळगावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला एक उपक्रम म्हणजे वाचनदीप होय. या अंतर्गत, वाचू आनंदे ऐकू आनंदे, याचे संपादक व समुह संचालक म्हणून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय ,उदगीर येथील मराठी विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. दीपक चिद्दरवार हे कार्य करत आहेत.
प्रत्येक रविवारी सकाळी 09 ते 10 या वेळात गुगलमीटवर साहित्य श्रवण यात एका वाचकावर एक तास वाचन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
वाचनदीप उपक्रमातील भागाचे वाचन स्वर याची जबाबदारी प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांच्याकडे होती. यात त्यांनी प्रसिद्ध कादंबरीकार शंकर विभुते यांच्या कंट्रोल युनिट या कादंबरीचे वाचन केले.
प्रसिद्ध लेखिका श्रीमती वृंदा दिवाण, प्रसिद्ध साहित्यिक शंकर विभुते यांनी प्रा डॉ गौरव जेवळीकर यांचे उत्कृष्ट वाचन केल्याबद्दल कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
अनेक मान्यवरांनी सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे निवडणुकीवर आधारित कादंबरीची निवड केल्याबद्दल प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांचे अभिनंदन केले.
एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी वाचनदीप या उपक्रमास उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचे आभार मानले. प्रत्येक रविवारी सर्वांनी एक तास साहित्य श्रवण करावे, असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले. या उपक्रमास विविध मान्यवर व साहित्यिक उपस्थित होते.