ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची जन परिवर्तन सेवा संघाची मागणी
उदगीर [एल.पी.उगीले] : पवित्र रमजान ईद निमित्त उदगीर येथील ईदगाह मैदानावर ईद उल फित्र चा नमाज आदा करण्यासाठी मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने समाज बांधवांना नमाज आदा करताना उन्हाचा त्रास होण्याची शक्यता आहे.
या करिता संपूर्ण ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची मागणी जन परिवर्तन सेवा संघाच्या वतीने करण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शहरातील वराह (डुक्कर) या जनावरांवर पायबंद करणे व शहरातील मुस्लीम समाजाच्या सर्व स्मशान भूमीची साफसफाई करण्याची ही मागणी उदगीर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे जन परिवर्तन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अझरोद्दीन शमशोद्दीन शेख व सामाजिक कार्यकर्ते सय्यद असलम,पठाण खाजा,शेख जहिर,शेख इफरोज,शेख उमर मुजमील,पठाण सत्तार ,शेख इफ रोज, शेख शाहरुख, सय्यद अस्लम, शेख वसीम, शेअर अवेस, शेख हमजा यांनी केली आहे.