कृषी महाविद्यालयास विविध पदाधिकाऱ्यांची भेट
उदगीर (एल. पी.उगीले)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथे सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.
महाविद्यालय प्रक्षेत्रावर सुरू असलेल्या अनुभवावर आधारित कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय खतांचे व्यावसायिक उत्पादन आणि विपणन , कुकूटपालन व्यवसाय व्यवस्थापन , जैव घटक आणि जैविक कीटकनाशकांचे उत्पादन , फळ व भाजीपाला काढणी व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन , इत्यादी प्रकल्पाला उदगीर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील जाणकार, राजकारणी तथा विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांना घेत असलेल्या प्रकल्पामध्ये व्यवसायातील संधी व त्याबद्दल मार्गदर्शन केले. पदाधिकाऱ्यानी सर्व प्रकल्पांची पाहणी करून सुरू असलेल्या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. यामध्ये उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रिती चंद्रशेखर भोसले विविध विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन राजेश्वर पटवारी ,
शिवाजी किसनराव पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. सूर्यवंशी ,उपप्राचार्य डॉ ए. एम.पाटील ,डीडीओ डॉ आनंद दापकेकर ,डॉ.शेख वसीम ,प्रा.एस.एस.नवले, डॉ .एस. एल. खटके , डॉ. के. पी. जाधव ,प्रा. एस .आर. खंडागळे ,प्रा. व्ही. एल. सोमवंशी , अनुष्का राजकुमार पटवारी इत्यादींची उपस्थिती होती.