झोपडपट्टीदादा,गुंड, हातभट्टीवाले, यांचे विरुद्ध लातूर पोलिसांची कडक कारवाईची मोहीम. एम.पी.डी.ए. अंतर्गत जिल्ह्यातील सातवी कारवाई.

0
झोपडपट्टीदादा,गुंड, हातभट्टीवाले, यांचे विरुद्ध लातूर पोलिसांची कडक कारवाईची मोहीम. एम.पी.डी.ए. अंतर्गत जिल्ह्यातील सातवी कारवाई.
लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्यातील झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले  यांचे विरुद्ध कडक कारवाई करण्याच्या आदेश दिले होते. त्यानुसार एम पी डी ए प्रमाणे कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील एम.पी.डी.ए.नुसार करण्यात आलेली सातवी कारवाई सार्वजनिक शांततेस धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूरी दिली. वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी तसेच लोकसभा निवडणूक-2024 अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गंत औसा शहरात राहणारा मोहसीन हबीब शेख उर्फ बाबा पठाण, वय 28 वर्ष याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
       एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाईचा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई  करण्यात येत आहे. मोहसीन हबीब शेख उर्फ बाबा पठाण याला 'एमपीडीए' कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची रवानगी छत्रपती संभाजी नगर येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. *पोलीस अधिक्षक श्री. सोमय मुंडे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील एमपीडीए नुसार करण्यात आलेली ही सातवी कारवाई आहे.
            कुख्यात गुन्हेगार मोहसीन हबीब शेख उर्फ बाबा पठाण, याच्या विरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे एकूण 11 गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये शस्त्रासह शरीराविरुद्ध, मालमत्ता चोरी करण्याचे  गुन्हे, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे, तसेच विनयभंग व हद्दपार आदेश चे उल्लंघन केल्या बाबतचा बाबतचे गुन्हे असे एकूण 11 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.    
               जनसामान्यात त्याची भीती होती. त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (औसा) चार्ज लातूर ग्रामीण सुनील गोसावी, पोलीस ठाणे औसा चे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, विवेकानंद चे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे मार्गदर्शनात औसा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे, पोलीस अमलदार मुबाज सय्यद, रामकिशन गुट्टे, तुमकुटे, शिवाजी गुरव, महारुद्र डीगे, बालाजी चव्हाण यांनी परिश्रम घेवून प्रस्ताव तयार करुन मा.जिल्हाधिकारी यांचे कडे मंजूरी साठी पाठविला होता. 
            सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, जमीर शेख, राजाभाऊ मस्के,संतोष खांडेकर यांनी नमूद आरोपी ताब्यात घेण्यासाठी मदत केली. 
          जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर वर्षा ठाकूर घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यावरून सदर आरोपीची 01 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील हर्सूल मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.

काय आहे एमपीडीए कायदा?

महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ,पायरसी) वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे गुन्हेगार यांच्या विघातक कृतींना प्रतिबंध करण्याविषयीचा कायदा सन 1981 (सुधारणा 1996, 2009 व 2015) अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सातत्याने सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.
सतत गुन्हेगारी कृत्य करणारे गुंड प्रवृत्तीच्या विरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) सारख्या कठोर कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येत असून यानंतरही लातूर जिल्ह्यातील गुंडगिरी व भाईगिरी वृत्तीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्याकरिता सदरची कार्यवाही करण्यात येणार असून लातूर पोलीस कडून जिल्ह्यातील धोकादायक गुंड व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या कुख्यात इसमांची माहिती संकलित करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *