भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्काराने डॉ नरसिंह भिकाणे सन्मानित
निलंगा (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याच्या ‘लेक लाडकी अभियान’ च्यावतीने दिला जाणारा ‘भारत गौरव राष्ट्र प्रेरणा २०२४’ हा राष्ट्रस्तरीय पुरस्कार मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
मागच्या दोन दशकांपासून डॉ नरसिंह भिकाणे सामाजिक चळवळीत आग्रेसर असून वैद्यकीय,राजकीय,साहित्यिक,सांप्रदायिक सेवा त्यांनी डॉक्टर, कवी,प्रवचनकार,राजकारणी,सामाजिक कार्यकर्ता म्हणून सतत दिली आहे.कोविड काळात केलेली आरोग्य सेवा,शेकडो सततची मोफत आरोग्य शिबिरे,अडचनीतील कुटुंबांना आर्थिक मदत,शेतकऱ्यांना मोफत खत व बीबीयाने वाटप,दुष्काळी गावांमध्ये मोफत पाणी टँकर वाटप आदीसह वेगवेगळ्या सामाजिक कार्यात त्यांनी वर्षानुवर्षे उल्लेखनीय योगदान दिले आहे.या सर्व कार्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आतापर्यंत ४० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,राज्य स्तरीय पुरस्कार त्यांना दिल्ली, मुबई,पुणे,नागपूर, औरंगाबाद, नांदेड,लातूर आदी ठिकाणी प्राप्त झाले आहेत. भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्काराने आणखीन त्यांच्या सन्मानात भर पडली आहे. या पुरस्काराबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांचे कौतुक केले जात आहे.