डॉ.प्रवीण बडे यांची प्रधानमंत्री जनकल्याण अभियान महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : आरोग्य क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या प्रिस्टाईन आयुर प्रायव्हेट लिमिटेड पुणे चे कार्यकारी संचालक डॉ. प्रवीण बडे यांची प्रधानमंत्री जनकल्याण जागरूकता अभियान च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, डॉ. प्रवीण बडे आरोग्यासह सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करतात. त्यांना आतापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून केंद्र सरकार संलग्न संस्था प्रधानमंत्री जनकल्याण जागरूकता अभियानाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी त्यांची नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष अनित कौशिक यांनी निवड केली. डॉ बडे यांनी या पदाचा नुकताच पदभार स्वीकारल्या बद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी तसेच आबासाहेब गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.