आनंद कोटंबे यांना बेदम मारहाण करणाऱ्या डॉक्टर घुगे यांचे सनद तात्काळ रद्द करावी

0
आनंद कोटंबे यांना बेदम मारहाण करणाऱ्या डॉक्टर घुगे यांचे सनद तात्काळ रद्द करावी

आनंद कोटंबे यांना बेदम मारहाण करणाऱ्या डॉक्टर घुगे यांचे सनद तात्काळ रद्द करावी

अहमदपूर (गोविंद काळे) : मौजे रोकडा सावरगाव येथील आनंद कोटंबे यांच्यावर लातूर येथील येथील आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे यांनी चक्क एका मातंग समाजातील युवकाला लिफ्टच्या कामांच्या निमित्ताने बेदम मारहाण केली असून,त्याला डांबून ठेवत त्याच्या गुप्तांगात मिर्ची आणि केमिकल भरत त्याला विषारी बिया खाऊ घातल्याचा प्रकार घडला असून,पीडित युवक हा सध्या लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून त्या युवकाला बघितले तर किती निर्दयी मारहाण झाली आहे याचा प्रत्यय येतो.अगदी हा प्रकार समोर आल्यानंतर देखील डॉक्टर घुगे यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही त्यांनी अमानुष असं कृत्य केले आहे.
डॉ. घुगे यांना अटक करून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी मातंग अस्मिता संघर्ष सेना संघटना यांच्या वतीने मुख्यमंत्री, ग्रहमंत्री यांना उपवीभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले व त्या निवेदनात काही मागण्या करण्यात आल्या. डॉ. घुगे व त्याच्या साथीदाराला तात्काळ अटक करण्यात यावी. डॉ. घुगे व त्याच्या साथीदाराची गुन्हे अन्व्हेषण विभागामार्फत सी बी आय चौकशी करण्यात यावी. पीडिताना 2000000 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. पीडितास वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. आरोपीवर कलम 307,342, 323,504,363,364,34 आय पी सी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. डॉ. घुगे यांची डॉकटर सनद रद्द करण्यात यावी. आनंद कोटंबे यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. असे मातंग अस्मिता संघर्ष सेना संघटनेच्या पदाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मास चे तालुका अध्यक्ष सुभाष गुंडीले, सचिव सतिश नामपल्ले, उपाध्यक्ष शिवाजी पिटाळे, मार्गदर्शक मधुकरजी इबिद्रे, सोमनाथ जीवारे, देविदास कांबळे, पंढरी हरगिले, अनिल गुंडीले, कोंडीबा गायकवाड यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *