डॉ.घुगे यांचे वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र व हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा;मातंग समाजाची मागणी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील आयकॉन सुपर स्पेशालिटि हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रमोद घुगे यांनी हॉस्पिटलच्या लिफ्टच्या कामाच्या संबंधाने मातंग समाजातील कामगार आनंद प्रल्हाद कोटंबे यांना अमानुषपणे मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.डॉ.प्रमोद घुगे यांनी पैशाच्या जोरावर लातूर शहरात दहशत निर्माण केले असून दलित समाजाच्या कामगाराला जातीय द्वेषातून माणुसकीला काळीमा फासणारे गुन्हेगारी कृती केले आहे. त्यांच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये लिफ्ट बसविण्याचे कंत्राट अनंत कोटुंबे यांना दिले होते त्या संबंधित कायदेशीर करारही केले होते. हे काम महागात पडत आहे या गैरसमजुने त्यांनी लिफ्ट बसविण्याचे चालू असलेले काम बंद केले आणि कामगार आनंद कोटंबे यांच्याकडे 50 लाख रुपयाची मागणी केली अन कुटुंबे यांना ते शक्य नसल्याने डॉ.प्रमोद घुगे यांनी आनंद कोटंबे यांचे अपहरण करून त्यांच्या फार्म हाऊस मधील म्हशीच्या गोठ्यात दोन दिवस दाबून ठेवले व भाडोत्री गुंडाकडून त्यांना सतत दोन दिवस अमानुष मारहाण केले.एवढेच नव्हे तर त्यांच्या गुप्तांगांमध्ये मिरचीची पूड टाकून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केला व मरणासन्न अवस्थेत रेल्वे स्टेशन रोडला टाकून दिले. कोटुंबे शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. लातूर जिल्ह्यातील पोलिस, जिल्हा प्रशासन आरोपी डॉ. घुगे यांचे सगेसोयरे असल्याने त्यांना पोलीस दाद देत नव्हते.अखेर सामाजिक संघटनेने प्रशासनावर दबाव वाढविल्याने त्यात कारवाई झाली पण अजूनही तीन-चार दिवस झाले तरीही डॉ.घुगे यांना पोलिसांकडून अटक होत नाही. एवढा अमानुष अत्याचार झाल्यानंतरही त्यांच्यावर ३०७ सारखा गुन्हा नोंद होत नाही, यासाठी समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांना 2 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात आरोपी डॉ. प्रमोद घुगे यांचे वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र व त्यांच्या हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा अशा आशयाचे निवेदन दिले आहे. याची प्रत माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री,माननीय विरोधी पक्ष नेते, माननीय पालकमंत्री,माननीय स्थानिक आमदार अमित देशमुख, माननीय पोलीस अधिक्षक,माननीय आयुक्त मनपा यांच्याकडेही देण्यात आल्याची यात नमूद केले आहे. या निवेदनावर सर्वश्री अशोक देडे, संतोष मस्के, दशरथ मस्के, गोरोबा लोखंडे, नारायण कांबळे,शिरीष दिवेकर, सुभाष सूर्यवंशी, अंगद वाघमारे , गायकवाड बी .पी.,मोहन शिंदे, सूर्यवंशी बी. पी.,आनंद वैरागे, के.के.मुखेडकर ,भानुदास कुडके, रामलिंग भडंगे,मारुती माने, दिनकर मस्के,संतोष पटनुरे, प्रवीण जोहारे, नागनाथ कलवले,तुकाराम केदासे, डॉ.शिवाजी जवळगेकर, मोहन सुरवसे, पी.के .सावंत आदीसह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.