मतदान कार्ड घेऊ द्या की र… मला बी मतदानाला येऊ द्या की र..
(लोकगीतातून मतदार जनजागृती)
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वीप कलापथकाच्या माध्यमातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी पारंपारिक लोकगीतांच्या माध्यमातून कोपरा गावातील सुजान नव मतदारांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी दि.६ रोजी सकाळी स्वीप पथकातर्फे जाहीर आवाहन करण्यात आले. स्वीप कलापथकाचे सदस्य प्रबोधनकार नागनाथ स्वामी यांनी भारुड या प्रबोधात्मक लोकगीतातून लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती केली.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,जयसिह जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथक जनजागृती करत आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य राज्यपुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने तलाठी सुरेद्र गिरी,ग्रामसेवक गितांजली सारोळे, सेवक अंगत गोरे सह शिक्षक जयप्रकाश हाराळे गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक बसवेश्वर थोटे तर आभार महादेव खळुरे यांनी मानले.