सातत्य व नियोजन पुर्वक अभ्यास करा यश नक्कीच मिळेल- विभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर
अहमदपूर (गोविंद काळे) : येथिल ज्ञानदिप अकाडमी मध्ये गुणवंताचा सत्कार व वर्धापण दिन साजरा करण्यात आला . याकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक मा श्री उधव इप्पर हो नाते तर प्रमुख मार्गदर्शक अहमदपूरचे पोलीस उप विभागीय अधिकारी मनीष कल्याणकर उपस्थित होते.
ज्ञानदीप अकॅडमी चा आज 12 वा वर्धापन दिन या निमित्तानं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून आलेले अकॅडमी चे विद्यार्थी विशाल इप्पर, ज्ञानेश्वर डोम्पले, विष्णू मुंडे यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
अकॅडमी चे संचालक इप्पर यांनी प्रास्ताविक केले यावेळी बोलताना ते म्हणाले की अकॅडमी ची स्थापना अकॅडमी चे मुख्य मार्गदर्शक मंचक इप्पर, आयपीएस (डी आय जी) यांच्या मार्गदर्शनातून झाली. फक्त 2 विद्यार्थी पासून सुरुवात झालेली अकॅडमी वर्षाला हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात व यशस्वी होतात. आतापर्यंत हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थी स्वतःची मेहनत, ग्राउंड व लेखी तयारी करून घेणारे शिक्षक, अकॅडमी ची शिस्त, यामुळे मोठ्या प्रमाणत विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थी आपल्या मनोगतात म्हणाले की ज्ञानदीप अकॅडमी ही गोर गरीब व होतकरू विद्यार्थी साठी अतिषयं चांगली आणि सेफ आहे. येथे कमजोर विद्यार्थ्याना घडवले जाते फक्त सातत्य ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच आमच्या सारखे सर्व सामान्य घरचे विद्यार्थी यशस्वी झालो आहोत.
मार्गदर्शन करताना मा. कल्याणकर साहेब म्हणाले की आपण सर्व जण ग्रामीण भागातील आहेत ग्राउंड आऊट ऑफ आले पाहिजे आणि लेखी ची पण चांगली तयारी करा तुम्ही सर्व जण यशस्वी होतात. अभ्यास करतेवेळी स्वतःच्या नोट्स काढा, न्युज पेपर ची कात्रण काढा, दररोज च्या चालू घडामोडी लिहून ठेवा. मन लावून अभ्यास करा .
शोले स्टाईल मध्ये अभ्यास करा, म्हणजे जसे आपण एखादा सिनेमा मन लावून पाहतो तो पूर्ण लक्षात राहतो मग अभ्यास का राहत नाही. त्यासाठी अभ्यास सुधा मन लावून करा तुम्ही या भरती मध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. या पोलिस भरती नंतर मी स्वतः तुमचा सत्कार करण्यासाठी येईल.
अकॅडमी चे आधार स्तंभ आमचे वरिष्ठ श्री मंचक इप्पर आयपीएस हे तुमच्या साठी आयडॉल आहेत कारण त्यांनी एका शेतकरी व गरीब कुटुंबामध्ये येवढे मोठे यश मिळवले आहे तर तुम्ही का नाही मिळवू शकत नाही.
ज्ञानदीप अकॅडमी ही सर्वांना घेऊन चालणारी अकॅडमी आहे. गणपती वेळी, जयंती वेळी पोलीस प्रशासनाला मदत करते, सामाजिक बांधिलकी सांभाळून चालवली जाणारी अकॅडमी म्हणजे ज्ञानदीप अकॅडमी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वाघमारे तर आभार प्रदर्शन नितीन गुट्टे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्राउंड प्रशिक्षक राम मेजर जितेंद्र मेजर महिला प्रशिक्षक अर्चना करपे, चांदणी कुजूर व संदिप नरवटे यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.