सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश…
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये चमकदार कामगिरी करून पदकांची कमाई केली यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे स्कूलची विद्यार्थिनी माही राजकुमार पन्हाळे ची निवड झाली आहे.
एमटीएस परीक्षा जळगाव मधील गुणवंत विदयार्थी श्रावणी सोडगीर -170/200, राज्यात चौथी,आयशा सय्यद -170, राज्यात चौथी, आदेश कलुरकर -154 केंद्रात पहिला, आदिल हाश्मी -110 केंद्रात दुसरा, राजवीर मुकनर -114 केंद्रात पाचवा, समृद्धी भोसले 106 केंद्रात आठवी आली आहे.
एमटीएस ऑलंपियाड परीक्षेत सिल्वर मेडल -07 व ब्रांझ मेडल-08 घेऊन घवघवीत यश सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी समी शेख-120/150, तनुज रेडेवाड -118, आदेश कल्लूरकर-116,आरोही भुरे-112, नैतिक केंद्रे-96,यश सोडगीर-92, राजवीर मुकनर -184/300 व तसेच ब्राँझ मेडल प्राप्त विद्यार्थी समृती भोसले -86,साईराम पोले-86,रितेश श्रीरामे- 82,सार्थक कलुरकर-78, राजवीर मुकनर 184, प्रतीक देशमुख- 176, गणेश नरवटे-174, समर्थ सुरकुटे-172,
हर्षद हाके-156 गुण घेऊन शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माननीय गणेश दादा हाके पाटील, सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, संचालक कुलदीपजी हाके, उपाध्यक्ष मानसीताई हाके,संचालिका शिवालिकाताई हाके, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या हर्षदा कदम मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.