कनिष्ठ महाविद्यालय खाजगी क्लासेसच्या अध्यक्षपदी प्रा.प्रदीपजी वीरकपाळे तर सचिवपदी प्रा.सिद्राम शेटकार
उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची बैठक समर्पण करिअर इन्स्टिट्युट येथे संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते खेळीमिळीच्या वातावरणात संघटनेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले कोरोना सारख्या महामारी मध्ये अन्नधान्य किट वाटप करुन जनसामान्यांना मानसिक आणि आर्थिक आधार देणारे तथा अनेकांचे अभिष्टचिंतन सोहळे साजरे करून आनंद द्विगुणित करणारे तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन मनोधैर्य वाढविणारे, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित असलेले, शैक्षणिक क्षेत्रात उदगीर पॅटर्न मध्ये एक आगळा-वेगळा ठसा उमटवलेले मागच्या 24 वर्षापासून अनेक डॉक्टर व हजारो इंजिनिअर घडवणारे शिक्षक म्हणून ज्यांचे नाव लौकीक आहे असे प्रा. प्रदीपजी वीरकपाळे यांची निवड करण्यात आली.
याशिवाय या संघटनेच्या सचिवपदी प्रा. सिद्रामजी शेटकार, उपाध्यक्षपदी प्रा. निलेश मंगळूरे व प्रा. गणेश बेद्रे, कोषध्यक्षपदी प्रा. अविनाश पाटील, कार्याध्यक्षपदी प्रा. सचिन शेळके, प्रमुख सल्लागार प्रा. परमानंद नागुरे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. परमेश्वर जयस्वाल, सहसचिव प्रा. श्रीकृष्णा वाडकर, सह कार्याध्यक्ष प्रा. साईनाथ काटेवाड, प्रमुख प्रवक्ता प्रा. अशरफ खान, मीडिया प्रमुख प्रा. सुनिल ढगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीला प्रा. परमानंद नागूरे, प्रा. परमेश्वर जयस्वाल, प्रा. युसुफ मुंजेवार, प्रा. प्रदीप वीरकपाळे, प्रा. सिद्राम शेटकार, प्रा. सचिन शेळके, प्रा. निलेश मंगळूरे, प्रा. अविनाश पाटील, प्रा. सुनील ढगे, प्रा. श्रीकृष्ण वाडकर, प्रा. रूकमाजी कदम, प्रा. परमेश्वर वाडकर, प्रा. सौ. पल्लवी कुलकर्णी, प्रा. अशरफ खान, प्रा. गणेश बेद्रे, प्रा. राधाकृष्ण जाधव, प्रा. पवन नलाबले, प्रा. संतोष पांडे, प्रा. साईनाथ काटेवाड, प्रा. सुनील विरकपाळे, प्रा. राजेश जाधव, प्रा. विजय पाटील, प्रा. राहुल बिरादार, प्रा. मनोज नरवाडे, प्रा. केशव बिरादार इत्यादी विविध क्लासेसचे तज्ञ संचालक उपस्थित होते.
ही निवड पुढील पाच वर्षासाठी करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अध्यक्ष प्रा. प्रदीपजी वीरकपाळे व नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्व क्लासेस संचालकाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा. प्रदीपजी वीरकपाळे म्हणाले की, उदगीर पिटीए चा पहिला सचिव मी होतो, माझ्या काळात मी सर्व क्लास संचालकांना त्यांचा अडचणी सोडवण्यासाठी खारीचा वाटा उचलला होता. आता पुन्हा पी. टी. एम. एम. उदगीर (ज्यु.) संघटनेची जिम्मेदारी सर्वांनी माझ्यावर टाकलेली आहे, तरी क्लासेस संचालकांच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता अतिशय सक्षमपने मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने संघटना चालवेन व कोणत्याच क्लासेस संचालकाला कसलीच अडचण येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेईन असा विश्वास दिला.