नव दाम्पत्यानी घेतली शपथ ‘आम्ही जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणार’
अहमदपूर (प्रतिनिधी)
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जिल्हातून जास्तीत जास्त मतदारांनी ७ मे रोजी मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावेत. यासाठी स्वीप कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात आली.यावेळी नव दाम्पत्यानी आम्ही जबाबदार नागरिक आहोत म्हणून मतदान करणार अशी शपथ घेतली.
अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी ‘मतदानाची शपथ’ देऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. या उत्सवात राष्ट्रीय कर्तव्य समजून सहभागी व्हावे, असे मत मांडले.नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी मार्गदर्शन करताना ‘मतदान अमूल्य दान ’असल्यामुळे गावातील प्रत्येक मतदार बांधवांनी ७ मे रोजी लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी दान करावे असे आवाहन केले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर, सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य राज्यपुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे, पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने, गावातील प्रतिष्ठित नागरिक,तलाठी निळकंठ कुलकर्णी,सह शिक्षक विकास मुंडकर,गणेश बयास,विश्वनाथ हत्ते गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक बसवेश्वर थोटे तर आभार महादेव खळुरे यांनी मानले.