देवव्रत मानेची इस्त्रो सहलीसाठी निवड, प्रथम क्रमांकाचे पारितोषक पाठवल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव
उदगीर (एल. पी.उगीले)
इस्कॉनच्या व्हॅल्यू एज्युकेशन कॉन्टेस्ट, श्रीमद्भगवद्गीता पाठांतर लेखी स्पर्धेत, लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालययाच्या तब्बल 14 विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त झाले.
लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे, इस्कॉन तर्फे श्रीमदभगवद्गीतेवर आधारित लेखी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यालयाने भरघोस यश प्राप्त केले. उत्कृष्ट सहभागी शाळा म्हणून प्रथम पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह विद्यालयाला प्राप्त झाले.तसेच स्पर्धेत सर्वप्रथम क्रमांक देवव्रत रमेश माने या विद्यार्थ्यांला प्राप्त झाला. इस्त्रो सहल, सायकल, प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. त्याला स्पर्धा प्रमुख नीता मोरे व किरण नेमट यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, माधव मठवाले, स्पर्धा प्रमुख नीता मोरे, किरण नेमट यांच्या हस्ते त्याचा विद्यालयात सत्कार करण्यात आला. स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे यांनी त्याचे कौतुक केले.