आंबेडकर जयंतीच्या निवडणुकीवरून हाणामारी गुन्हे दाखल
उदगीर (एल. पी. उगिले) : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंतीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष पदाला विरोध का केलास? असे म्हणून आरोपींनी संगणमत करून फिर्यादीस शिवीगाळ करून डोक्यात मारून जखमी केले आहे. याप्रकरणी जखमीच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघा विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, फिर्यादी सूर्यभान अशोक कांबळे (रा. गांधीनगर उदगीर) याने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. शहराजवळ एका धाब्याच्या मोकळ्या जागेत आरोपींनी संगणमत करून फिर्यादीस सार्वजनिक जयंतीच्या बैठकीच्या दिवशी अध्यक्ष पदाबाबत विरोध का केला होता? असे म्हणून आरोपीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच काचेच्या बाटलीने डोक्यात मारून जखमी केले. आणि जेवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार दिल्यावरून आरोपी राहुल सुतार, पप्पू डोंगरे, शिवलिंग, बालाजी साबणे (सर्व रा. उदगीर) यांच्या विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 196/24 कलम 324, 323, 504, 506, 34 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार कांबळे हे करत आहेत.