मोफत रोग निदान व औषधोपचार,पंचकर्म तथा अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर
उदगीर(एल.पी.उगीले) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती; व जागतिक आरोग्य दिन व होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचे जनक डॉ.सॅम्युअल हैनिमन जयंती जागतिक होमिओपॅथी दिन सप्ताह निमित्ताने “माझे आरोग्य-माझा अधिकार” या जागतिक आरोग्य संघटनेने वर्ष-२०२४ साठी घोषित केलेल्या संकल्पनेनुसार दिनांक :- ०८ एप्रिल ते १८ एप्रिल २०२४ या कालावधीत दररोज सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेदरम्यान धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर येथे मोफत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व रक्त,लघवी तपासणी तथा अल्प दरात प्रसूती शस्त्रक्रिया,हर्निया,हायड्रोसील, अपेंडिक्स,मुळव्याध,भगंदर या आजारासंबंधीच्या शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये पक्षाघात(लकवा-अर्धांगवायु), संधिवात, आमवात, मणक्याचे विकार, मधुमेह, लठ्ठपणा ,श्वसनासंबंधीचे विकार तथा पोटाचे विकार(आम्लपित्त, मलावष्टंभ), मुतखडा,त्वचाविकार-सौंदर्य विषयक समस्या,स्त्रीयांचे विकार(मासिक पाळी समस्या,श्वेतप्रदर,रक्तप्रदर),लहान मुलांचे विकार,कान-नाक-घसा-दातांचे विकार,इत्यादी आजारांची ऍलोपॅथी, आयुर्वेद व होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतीच्या तज्ञ डॉक्टर्सच्या सहकार्याने मोफत तपासणी करून आवश्यकते नुसार औषधोपचार करण्यात येणार आहे.तरी या शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ.दत्तात्रय वि.पाटील,डॉ.मंगेश मुंढे,डॉ.राजेंद्र धाटे,डॉ.उषा काळे,डॉ.पुष्पा गवळे, डॉ.रविकांत पाटील,डॉ.अमोल पटणे, डॉ.नामदेव बनसोडे,डॉ.रश्मी गंदगे डॉ.प्राजक्ता जगताप,डॉ.स्नेहल पाटील, डॉ.योगेश सुरनर,डॉ.दीपिका भद्रे, डॉ अस्मिता भद्रे,डॉ.नम्रता कोरे, डॉ.शिवकांता चेटलुरे,डॉ.शिवकुमार होटुळकर,डॉ.शिवकुमार मरतुळे, डॉ.अमोल पाटील,डॉ.विष्णुकांत मुंढे,डॉ.ओम चिट्टे यांनी केले आहे.