सौ सुवर्णा दिघे यांची गौरवास्पद निवड, पुण्यामध्ये आंबेगाव अवधूत रेसीडेन्सी मध्ये आय कार्ड सोहळा संपन्न
पुणे (प्रातिनिधी) : धन्वंतरी फाऊंडेशन सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था गेल्या दहा वर्षापासुन वयोवृध्द लोकांनसाठी नर्सिग स्टाफ केअर टेकर पुरवण्याचे काम करत आहे.गेले दहा वर्ष हे काम करत असताना दहा वर्षाच्या कारकिर्दीचे प्रामाणिक पणे केलेल्या कामाचे फळ म्हणून निष्ठावंतांना कार्यकारणीवर घेऊन त्यांना अधिकृतपणे ओळखपत्र वाटप करण्यात आले.
सौ.सुवर्णा दिघे यांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पद,डॉ. अविनाश दिघे यांना कार्यकारी उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पद आंतरराष्ट्रिय मानवाधिकार न्यायिक महासंघ (भारत सरकार संलग्न )यांच्या वतीने देण्यात आले आहे.
मानवधिकार संलग्न सामाजिक उद्देशाने सर्वसमावेशक मार्गदर्शक केंन्द्र सामाजिक उद्देशाने सुरू केले आहे. नागरिकांचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये हक्कावर गदा येता कामा नये. जर कोणाची काही अडचण असेल तर गरजूंनी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षा सौ सुवर्णा दिघे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. अविनाश दिघे यांनी केले आहे. त्यांना संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक8308704132,किंवा
7558485050 हा असून समाजसेवी भावनेने आम्ही काम करत असल्यामुळे गरजूंनी संपर्क साधावा असेही सांगितले आहे.