संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे भगवद्गीता परीक्षेत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : माहे जानेवारी महिन्यात इस्कॉन च्या व्हॅल्यू एज्युकेशन कॉन्टेस्ट तर्फे घेण्यात आलेल्या श्रीमद् भगवत गीता लेखी स्पर्धेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत विद्यालयाचे 120 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात श्रीधर बालाजी कदम व राधिका राजू गुंडाळे हे सर्वप्रथम आले असून इतर विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र मिळालेले आहे.
या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भगवत गीता या ग्रंथाविषयीची विस्तारित अशा स्वरूपाची माहिती झालेली आहे. विद्यार्थ्यांनी भगवद्गीते चे वाचन केले आहे.
या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापक आशा रोडगे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
या नेत्र दीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेशाचे प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, सचिव प्राचार्या रेखा तरडे-हाके, उपाध्यक्षा एडवोकेट मानसी हाके, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीनाक्षी तोवर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.