स्वार्थ सोडा, परमार्थ करा ही खरी श्रेष्ठ भक्ती – प्रशांत महाराज खानापूरकर
उदगीर (एल. पी.उगीले) : प्रत्येकी व्यक्ती स्वार्थी झालेला आहे.या स्वार्थी जगामध्ये कोणाला परोपकार करावा किंवा इतरांच्या भावनांचा आदर करावे, याचे भान राहिलेले नाही. यासाठी स्वार्थ सोडा आणि परमार्थ साधा, ही भक्ती भगवंता पर्यंत जाऊन पोहोचेल. असे भागवताचार्य प्रशांत महाराज खानापूरकर यांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवसी भागवत कथा सांगताना विशद केले. श्री समर्थ धोंडू तात्या महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित केलेल्या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये काल्याची कथा वर्णन करत असताना ते म्हणले काला की, एकट्याने खायचे नाही तर इतरांना खाऊ घालायचे. जो एकटा खातो तो शेवटी उपाशी राहतो, आणि जो इतरांना खाऊ घालतो तो पोटभर जेवतो.स्वतःचा विचार करणारे माणसे भरपूर आहेत पण स्वतःच्या विचारापेक्षा इतरांचा विचार करावा.इतरांचा विचार करण्याची सवय लागली की माणसं स्वार्थ सोडून परमार्थ करतील.प्रत्येकाने स्वार्थ न करता परमार्थ करावा. भागवत कथेतून राष्ट्रीय एकात्मता, यासारख्या अनेक विषयांना हाताळून त्यांनी प्रबोधन केले.निळकंठ महाराज काश्टे, संतोष महाराज पवार आणि भागवत खुडे महाराज, अथर्व चव्हान,रंजन गुरूजी चव्हान यांची संगीत साथ लाभत आहे. हजारो भाविकांचा उपस्थितीमुळे डोंगरशेळकी परिसर भक्तीमय झालेला आहे. दिनांक 11 रोजी सकाळी 11 ते 1 भागवत कथा होईल व दुपारी 2 ते 4 या वेळामध्ये गुलालाचे कीर्तन होऊन दिनांक 12 एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समर्थ धोंडू तात्या संस्थांन व ग्रामस्थ मंडळ डोंगर शेळकी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.