मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवणाऱ्याला समाज जागा दाखवणार, टांगा पलटी घोडे फरार होणार – मनोज जरांगे पाटील
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी शहरात मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत झाले. माणिकराव धनुरे मंगल कार्यालयात सकल मराठा समाज संवाद बैठक संपन्न झाली. मनोज जरांगे पाटील यांनी देवणी तालुक्यातील ज्या आंदोलनाकावर गुन्हे दाखल झाले त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशांत पाटील दवणहिप्परगा,प्रा,अनिल इंगोले, राजाराम पाटील, मलबा घोणसे, धनराज बिरादार,पत्रकार राहुल भीमराव बालुरे, ज्ञानेश्वर शेंडगे, नामदेव मुराळे, संदीप पाटील, कृष्णा इंगोले, किशोर बिरादार, संदीप गुरणाळे,व चिमुगले याचा हि जरांगे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वनमाला बिरादार, नम्रता हुसळणाळे, मयुरी कोयले, अनुष्का मुराळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले की, आम्ही ओबीसीतून संरक्षण घेतल्याशिवाय गप बसणार नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज बिरादार व आभार प्रा,अनिल इंगोले यांनी मांडले, पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.