अहमदपूर पंचायत समितीच्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा सत्कार संपन्न

अहमदपूर पंचायत समितीच्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा सत्कार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अहमदपूर पंचायत समितीच्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती हरिभाऊ येरमे हे होते तर तर व्यासपीठावर माजी सभापती दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव केन्द्रे, सभापती सौ. गंगासागर जाभाडे,सौ. भाग्यश्री क्षिरसागर,भाजपचे तालुकाध्यक्ष हणमंत देवकते, व्यंकटराव जाभाडे, पंचायत समितीचे सदस्य कमलाकर पाटील, राजकुमार खंदाडे, चंद्रसेन पाटील, रामभाऊ नरवटे, माजी उपसभापती निळकंठ पाटील आदी उपस्थित होते. माजी मंत्री विनायकराव पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंचायत समितीच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी अहमदपूर तालुक्यातील अनेक गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंचांनी माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा सत्कार केला.यावेळी तालुक्यातील सरपंच शुकूर जागीरदार,केरबा कांबळे, माजी उपसभापती देवीदास सुरनर,व्यंकट पाटील, बाबुराव बावचकर, नितीन माने, कमलाकर शेकापुरे, शेषेराव राठोड,इतिराज केन्द्रे, बाळु आकनगिरे,संग्राम नरवटे, गोविंद दगडे, माधव शेळके, शिवाजी देवकते,बाळु केन्द्रे,धनराज पाटील, नागनाथ सुरनर,बाळू मुंढे, अमोल माकणे, पांडुरंग कांबळे, विठ्ठल मुळे, सुखदेव कदम, विनायक सुरनर,माधव देवकते, गणेश पोले, नितीन नरवटे, तुकाराम देवकते, नरसिंग कोंडेवाड, अर्जुन राठोड, बालाजी चव्हाण, यांच्या सह अनेक गावचे सरपंच उपसरपंच, माजी सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर तालुक्यातील सरपंचांना विविध येणाऱ्या अडचणी संदर्भात गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड यांच्या उपस्थितीत माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी आढावा बैठक घेऊन सरपंचाच्या अडीअडचणी सोडविल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामभाऊ नरवटे यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार गोविंद गिरी यांनी मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!