शालेय शिक्षणापासुन एकही विद्यार्थी वंचित राहायला नको

शालेय शिक्षणापासुन एकही विद्यार्थी वंचित राहायला नको

शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे
अमरावती (राम जाधव) : शाळेच्या पहिल्या दिवशीच शिक्षण सभापती आशिष कुमार गावंडे यांनी घेतल्या शाळेच्या भेटी गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्‍या कहराने राज्यातल्या सर्वच शाळा बंद होत्या. ज्यामुळे जवळ जवळ सर्वच शाळा वसान झाल्यासारखे चित्र तयार झाले होते. परंतु आजब-याच महिन्यांनी कोव्हिड रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्याचे स्वागत सर्व शिक्षकांनी केले आहे. आज दिनांक २८ जून रोजी शाळा सुरू झाल्याबरोबर शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे यांनी शिक्षणाधिकारी डॉ.अब्दुल राजीक यांच्यासह मनपाच्या विविध शाळांना भेटी दिल्या. मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा गाडगेनगर व उच्च प्राथमिक मनपा शाळा क्र.18 प्रविण नगर या ठिकाणी भेट दिली असता मुख्याध्यापक व शिक्षकांनी शिक्षण सभापतींचे पुष्प देऊन स्वागत केले व त्यानंतर आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला शिक्षण सभापती यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. याच वेळी काही पालक वर्ग शाळेमध्ये आपल्या पाल्यांच्या अॅडमिशन साठी आपल्‍या पाल्‍यांसह उपस्थित झाले. तेव्‍हा या विद्यार्थ्यांना शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे व शिक्षणाधिकारी यांनी पुष्प देऊन स्वागत केले आणि पुस्तके व गणवेश वितरीत केले. नंतर शिक्षक व मुख्याध्यापकांची विद्यार्थ्यांच्या नवीन अॅडमिशन बाबत सखोल चर्चा करण्यात आली आणि शाळेच्या अभ्यासक्रमाबाबत व वार्षिक नियोजनाबाबत मुख्याध्यापकांकडून माहिती घेण्यात आली. आशिष गावंडे यांनी सर्वांना संबोधिले की, यावर्षी शाळे मधला किंवा शाळेच्या परिसरात राहणारा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहायला नको. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या थेट घरापर्यंत संपर्क साधावा व शाळेची पटसंख्या वाढवावी. शाळेचे विद्यार्थी फाड फाड इंग्रजी बोलतील असे शाळेमध्‍ये नियोजन करावे.

यानंतर संपुर्ण शाळा इमारतीचे निरीक्षण करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. संध्या वासनिक, कु. मंजू वानखडे, चैताली टोपरे, योगिता निमजे, भाग्यश्री ढोमने, स्वाती घाडगे, वैशाली महाजन, मुख्याध्यापिका प्रीती बाराहाते, धीरज काळे, रेखा कांबळे, मनीषा गावणार व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.

About The Author