देवणी खुर्द ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

देवणी खुर्द ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

देवणी खुर्द जि प प्रा शाळेत येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त औचित्य साधुन लसीकरण घेण्यात आले गावकऱ्यांचे लसीकरणाला मोठा प्रतिसाद

देवणी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम देवणीतालुक्यातील देवणी खु ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने covid-19 लसीकरणाचा कार्यक्रम जि.प.शाळेमधे घेण्यात आला त्यामध्ये गावातील १५१ नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली, तसेच राजर्षी शाहु महाराजांच्या प्रतिमेची पुजन संरपच यशवंत कांबळे,उपसंरपच विठ्ठल शिंगडे, डॉ संजय घोरपडे, नरवटे के एन,मनोहर पाटील,रमेश कांबळे,सुभाष पाटील, अनिल कांबळे, शंकर पाटील, नामदेव मुराळे,माजी संरपच चंद्रकला कांबळे, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार गरड,संजय गरड ,पत्रकार रणदिवे लक्ष्मण,ज्ञानोबा कांबळे, राजु गरड, वैभव मुराळे , भरत गिरी, प्रकाश म्हेत्रे, धिरज पाटील,श्रीकांत चामे,सुनील कांबळे, आदींनी पुजन करुन लसीकरण सुरुवात करण्यात आली यासाठी डॉ.संजय घोरपडे, सकनुरे एस जी आरोग्य सहाय्यक,बावगे एल के, आरोग्य सेवक ,गायकवाड एस बी आरोग्य सेविका,नारंगवाडे जे व्ही आरोग्य सेविका, वच्छेलाबाई रणदिवे , शोभा रणदिवे ,रजेना रणदिवे आशा कार्यकर्ती, कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. या शबिरात मोफत कोविडची लस देण्यातआली याप्रसंगी कोरोनाची कोवीशिल्ड लस गावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत लसीकरण करण्याची माहिती देण्यासाठी संरपच यांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांनी लसीकरण १५१ जनानी रविवार २७/६/२१ रोजी लसीकरण करुन घेतले तसेच संरपच, उपसरपंच, सदस्य, प्रेरक, डॉ ,नर्स आशा कार्यकर्ती यानी, सर्व टिमने परिश्रम घेतले.

About The Author