लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल. पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव अण्णाराव केंद्रे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार, श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होत्या.
व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी, समाजासाठी,शेतकऱ्यांसाठी, विधवा पुनर्विवाहासाठी केलेल्या महान कार्याविषयी सविस्तर माहिती सांगितली.अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी शिक्षणामुळे आपली प्रगती होत असते.एका अविद्येने किती नुकसान होते.सर्वांनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करुन परीसरातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.सुत्रसंचलन सौ दिपाली भावसार यांनी केले.