सामाजिक जाणीवा जपत 41 जणांचे रक्तदान

0
सामाजिक जाणीवा जपत 41 जणांचे रक्तदान

सामाजिक जाणीवा जपत 41 जणांचे रक्तदान

उदगीर (एल. पी. उगिले) : सामाजिक बांधिलकी जपून आपण या समाजाचे काही देणे लागतो. या विचाराने रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणत उदगीर येथे उदागीर बाबा समाधीस्थळी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते सद्गुरु उदागीर बाबाच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी तहसीलदार राम बोरगावकर यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांनीही रक्तदान केले, आणि नवयुवकांनी रक्तदान करावे, रक्तदान केल्याने कोणाचे तरी प्राण वाचू शकतात. असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनी रक्तदान केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कै. नागप्‍पा अंबरखाने ब्लड बँकेचे डॉ. बसवराज शेटकर, पत्रकार रामभाऊ मोतीपवळे, उदयगिरी अर्बन क्रेडिट सोसायटीचे सचिव दिगंबर बिरादार, तलाठी शंकर जाधव, रोहित मोतीपवळे, बाबासाहेब कांबळे, शिवलिंग कडोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मठाधीश जयेश गुरु, सतीश गिरी महाराज यांच्या हस्ते रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 41 जणांनी रक्तदान करून रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल आभार ही व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *