स्वीप पथकाद्वारे सुनेगाव शेंद्री येथे केली मतदार जनजागृती
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री गावातून ७ मे रोजी १००% मतदान करण्यासाठी विविध लोकगीतातून ११एप्रिल रोजी सकाळी उपस्थितीत मतदार बंधूना मतदान करण्यासाठी स्वीप पथकाने जनजागृती केली.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे ,जयसिंह जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने,
तलाठी शिवराज कांबळे,विजय गडेकर,सेवक बालाजी वाघमारे, यांच्या सह गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.