सामाजिक एकोपा, शांती, समृद्धीसाठी अल्लाहकडे दुआ
अहमदपूर शहरासह तालुक्यात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी : ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण; एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरासह तालुक्यात ‘ईद-उल-फित्र’ (रमजान ईद ) गुरूवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. अहमदपूर शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९.३० वाजता
मौलाना मुफ्ती मुहम्मद फाजीलसाब यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. केल्यानंतर उपस्थितांनी समस्त मानवाच्या कल्याणासाठी अल्लाहकडे दुआ मागितली.
मौलाना मुफ्ती मुहम्मद फाजीलसाब
यांचे बयान (प्रवचन) झाले. त्यांनी ‘ईद-उल-फित्र’च्या संदर्भाने कुरआन शरिफने दिलेला संदेश, हदीसमध्ये सांगितलेला उपदेश आपल्या बयानमध्ये सांगितला.
अल्लाहने, ईश्वराने प्रत्येक माणसाला चांगुलपणासह जन्म प्रदान केलेला आहे. परंतु, मानसांतील द्वेष, मत्सर, लोभ, अहंकार यामुळे चांगुलपणा लोप पावत आहे. ऐ अल्लहा आम्ही सर्वजण तुझीच लेकरं, आमची चुक तुच पदरात घेणार आहेस याचा आम्हाला दृढ विश्वास असल्यामुळे आमच्या चुका माफ करुन पुन्हा एकदा माणुस म्हणून जगण्याची संधी दे तसेच देशाच्या प्रगतीसाठी भाईचारा जपायला हवा देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी भाईचारा जपणे अवश्यक आहे, असे आवाहन मौलाना मुफ्ती मुहम्मद फाजीलसाब यांनी करून मानव कल्याणासाठी अल्लाहकडे दुआ मागितली.
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आ. बब्रुवान खंदाडे, भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख ( ठाकरे गट ) बालाजी रेड्डी, माजी सभापती भारत चामे, माजी सभापती शिवानंद हेंगणे,सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर,उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार शिवाजी पालेपाड, तलाठी संघाचे अध्यक्ष महेश गुपिले,माजी जि.प. सदस्य माधव जाधव, विकास महाजन, निखील कासनाळे,माजी नगरसेवक राहुल शिवपुजे, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, चंद्रकांत मद्दे, राजकुमार मजगे, बाबुराव बावचकर, देवानंद मुळे,संजय पवार, माजी नगराध्यक्षा
सरस्वतीताई कांबळे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, राजकुमार खंदाडे, सुधिर गोरटे, भारत सांगवीकर, सोमेश्वर कदम,
माजी नगरसेवक अभय मिरकले, आशिष तोगरे, प्रा. अनिल चवळे, अशोक सोनकांबळे, सूर्यकांत अय्या आदी उपस्थित होते.
मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांचा सत्कार करण्यात आला.