हिंपळनेर येथे टाळ-मृदंगाच्या निनादात, ग्रंथ दिंडीत वारकऱ्यांनी केली मतदार जनजागृती
चाकूर (प्रतिनिधी) : लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी चाकूर तालुक्यातील हिंपळनेर या गावातून ७ मे रोजी १००% मतदान होण्यासाठी दि.१२ रोजी सकाळी हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या औचित्याने टाळ-मृदंगांच्या निनादात, हरिनामाच्या गजरात ग्रंथ दिंडीत अनेक वारकऱ्यांनी पावले टाकत केली मतदार जनजागृती.कपाळी टिळा,अष्टगंध अन् बुक्का लावून हातात भगवी पताका घेऊन टाळ मृदंगाचा गजर अन् मुखी मतदार जनजागृतीचे जयघोष करीत दिंडीत पावले टाकत वारकऱ्यांसोबत सोबत स्वीप पथकाने केली जनजागृती.दिंडीत उपस्थितीत गावकरी मतदार बंधू व भगिणींना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन दि. ७ मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत आपल्या गावातून जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे. व आपणास संविधानाने दिलेला हक्क गावातील प्रत्येक मतदार बांधव बजावावा आसे पथकाच्या वतीने आवाहन करण्यात आले.या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर, सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे ,जयसिंह जगताप यांच्या आदेशाखाली अहमदपूर-चाकूर मतदारसंघात ‘सृजन’ स्वीप कलापथकाद्वारे जनजागृती कार्यक्रम करण्यात येत आहे.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलापथकाचे प्रमुख राज्यपुरस्कार प्राप्त कलाध्यापक महादेव खळुरे, शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,श्रीमती अर्चना माने, पुरुषोत्तम काळे आदिनी परिश्रम घेतले.यावेळी तलाठी प्रमोद वंगवाड, ग्रामसेवक राम बदने प्रतिष्ठित नागरिक धंनजय कोरे, शेख मुबारक,रामेश्वर गुंडवाड , जगदीश कोरे,शिवशंकर कोरे, लक्ष्मण घोसे यांच्या सह गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते.