वळसंगी व आंबेगाव येथे भारुड या लोकगीतातून केली मतदार जनजागृती

0
वळसंगी व आंबेगाव येथे भारुड या लोकगीतातून केली मतदार जनजागृती

वळसंगी व आंबेगाव येथे भारुड या लोकगीतातून केली मतदार जनजागृती

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी वळसंगी व आंबेगाव या गावातून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावेत.दि. ७ मे रोजी १००% मतदान करुन आपल्या जिल्हाचे नाव उंचवावेत असे आवाहन अहमदपूर चाकुरचे स्वीप कला पथकाद्वारे भारुड या लोकगीतातून सांगण्यात आले. तसेच स्वीप जनजागृती कार्यक्रमात पारंपरिक लोकगीत,लावणी,पोवाडा,गोंधळ व भारुड या गीतातून मतदार बांधवांना मतदान करण्याचे आवाहन कराण्यात आले.

या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे पथक प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,बस्वेश्वर थोटे,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने,आदिनी परिश्रम घेतले.
आंबेगाव व वळसंगीचे तलाठी अंजली महाजन,ग्रामसेवक – सचिन तावरे,पोलीस पाटील – मनिषा गुंडरे,कोतवाल – अच्युत बामणे पार्वती पाकलवाड,माजी सैनिक माधव गुंडरे, प्रतिष्ठित नागरिक नंदकुमार बोडके ,ज्ञानोबा येरमे ,बापूराव बोडके,पोलीस पाटील रामेश्वर जगताप, रघुनाथ सूर्यवंशी, व गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *