सुंदर हस्ताक्षरामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो- कवी प्रा.डॉ.सय्यद अकबर
अहमदपूर (गोविंद काळे) : संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर येथे कवी प्रा.डॉ. सय्यद अकबर यांचे सुंदर हस्ताक्षर कसे काढावे व सुंदर हस्ताक्षराचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापीका आशा रोडगे होत्या. सोबत मु.अ. मीनाताई तौर व प्रा. सय्यद शहारूख सर उपस्थित होते. आपल्या सुंदर हस्ताक्षराच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कवी प्रा.डॉ.सय्यद अकबर लाला म्हणाले, सुंदर हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी मदत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की सुंदर हस्ताक्षर ही दैवी देणगी नसून, ती एक प्रयत्न साध्य कला आहे. सुंदर हस्ताक्षरामुळे, विद्यार्थ्यांचे जीवन पण सुंदर होते. ज्याच्या अक्षराला वरळण असते त्याच्या जीवनाला वळण लागले.अक्षर सुधारण्यासाठी मनाची एकाग्रता लागते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अक्षर सुधारण्यासाठी दोन शब्दात अंतर किती असावे,अक्षर सुंदर वळणदार काढण्यासाठी कोण कोणते प्रयत्न करावे, शब्दाला काना, मात्रा, वेलांटी कशी दयावी? याची पण माहिती सुरेख प्रत्यक्ष कृतीतून दाखवली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सतीश साबणे यांनी केले. आभार मीना तौर यांनी मानले.शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.