लालबहादुर माध्यमिक विद्यालयात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

0
लालबहादुर माध्यमिक विद्यालयात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

उदगीर (एल.पी.उगीले) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात महामानवाला अभिवादन करण्यात आले.या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड तर प्रमुख अतिथीस्थानी अभ्यास पूरक मंडळाच्या सहप्रमुख मीनाक्षी कस्तुरे, पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,माधव मठवाले, रामेश्वर मलशेटे उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी मीनाक्षी कस्तुरे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या ,” डॉ.आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय . व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा असे ते म्हणत.”
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक अंबादास गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजनैतिक, न्याय, साहित्य, पत्रकारिता या क्षेत्रातील योगदाना विषयी माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक दहावी सहप्रमुख लक्ष्मी चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार किरण नेमट यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी पर्यवेक्षक श्रीपाद सन्मुखे, अभ्यासपूर्वक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार व सर्वच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!