श्यामलाल हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
उदगीर (एल.पी.उगीले): येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक बालाजी चव्हाण, पर्यवेक्षक राहुल लिमये, प्रा. भारत खंदारे, जेष्ठ शिक्षक संजय देबडवार, नारायण कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य यांनी सर्वांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा संदेश दिला.
प्रा. भारत खंदारे, नारायण कांबळे, सुभाष सोनकांबळे, संजय देबडवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्या विषयी माहिती दिली. त्यांनी स्वतंत्र भारतातील सर्वच मानवजातीच्या उद्धारासाठी व विकासासाठी कार्य केले, शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा असा संदेश दिला. भारतीय समाजात समता, बंधूता प्रस्थापित करण्यासाठी व शोषित पीडित, कामगार, यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
या महापुरुषाचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे, यासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप मध्ये मुख्याध्यापक बालाजी चव्हाण यांनी सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. व सर्व भारतीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाच्या विकासासाठी कार्य करावे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी यांनी केले.