राज्य परिवहन मंडळाच्या चालकास मारहाण ; एका इसमा विरूध्द गुन्हा दाखल

0
राज्य परिवहन मंडळाच्या चालकास मारहाण ; एका इसमा विरूध्द गुन्हा दाखल

राज्य परिवहन मंडळाच्या चालकास मारहाण ; एका इसमा विरूध्द गुन्हा दाखल

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील राज्य परिवहन महामंडळातील चालक अहमदपूर-लातुर बस मधील प्रवाशांना लातुरला घेऊन जात असताना दि १३ एप्रिल रोजी शहराअंतर्गत एका इसमाने दोन ते तीन वेळा बस अडवुन ज्ञानराज आश्रमासमोर टेंबुर्णी चौकात चालकास लाथाबुक्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका इसमा विरूध्द अहमदपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे

याविषयी पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की राज्य परिवहन महामंडळाचा अहमदपूर आगाराचा बस चालक जुबेर इमाम सय्यद वय ३५ वर्ष रा मंगळूर ता जळकोट हे आपल्या ताब्यातील एमएच २० बीएल २०७० क्रमांकाची अहमदपूर – लातुर ही प्रवासी बस घेऊन लातुरकडे जात असताना मोटार सायकल क्रमांक एमएच २४ ए डी ३५४७ वरील कमलाकर नामदेव गोरे रा अहमदपूर वय ५२ वर्ष व्यवसाय हॉटेल यांनी दि १३ एप्रिल रोजी दुपारी १२: १० वाजण्याच्या सुमारास शहराअंतर्गतच दोन ते तीन वेळा बसला अडवुन बस चालक आपले शासकीय कर्तव्य पार पाडत असताना ज्ञानराज आश्रमा जवळ टेंबुर्णी चौकात शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करून शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच शासकीय गणवेशाचे शर्ट चा लुप्स तोडला वगैरे बसचालकाने दिलेल्या फिर्याद वरून सदरील इसमा विरूध्द विरुद्ध अहमदपूर पोलीसात गुरनं २३३/२०२४ कलम ३४१,३५३,५०४,५०६, भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!