लातूर लोकसभेचे उमेदवार खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
लातूर लोकसभेचे उमेदवार खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

लातूर लोकसभेचे उमेदवार खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे उमेदवार लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त अहमदपूर शहरातील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश दादा हाके पाटील,
माजी आमदार बब्रुवान खंदाडे,जिल्हा सरचिटणीस अॅड भारत भाऊ चामे,किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माजी सभापतीअशोक काका केंद्रे, तालुका विस्तारक चंद्रशेखर डांगे,राजकुमार मजगे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी,तालुका अध्यक्ष प्रताप पाटील,शहर अध्यक्ष सुशांत गुनाले,जिल्हा चिटणीस हणमंत देवकते,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामानंद मुंढे,जिल्हाउपाध्यक्ष ओम पुणे,डॉ.सिध्दार्थ सुर्यवंशी, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बबलू पठाण,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ओमकार पुणे,तालुका सरचिटणीस माणिक नरवटे,निखील कासनाळे,अमित रेड्डी, नाथराव केंद्रे,अनुसूचित जाती मोर्चा चे तालुका अध्यक्ष रामनाथ पलमटे,जिवण गायकवाड,मन्नानभाई शेख, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे,महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा पुष्पाताई तेलंग,शर्मा ताई यांच्या सह अहमदपूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!