डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातल्या लोकापर्यंत पोहोचवली पाहिजेत – प्राचार्य श्रीरंग खिल्लारे
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ , अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वी सार्वजनिक जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पंचशील ध्वजारोहण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य श्रीरंग खिल्लारे हे पुतळ्यासमोर अभिवादन सभेत आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की,
तथागत गौतम बुद्धाच्या नंतर या पृथ्वीतलावरी तेजस्वी सुर्य म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉ. बाबासाहेब यांचे कार्य हे तेजस्वी सूर्यासारखे असून त्यांनी जनसामान्यासाठी व तळागाळातल्या लोकांसाठी कार्य केले आहे त्यांच्या अथक परिश्रमाने आज भारताचे संविधान तयार झाले आहे. आज बाबासाहेबांनी सर्वांना सर्व समान हक्क आपल्या संविधानामध्ये दिल्यामुळे तळागाळातला व्यक्ती आज सन्मानाने जगत आहेत आपण सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची आणि त्यागांची जाण ठेवून. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे असे आपल्या भाषणात प्रमुख वक्ते श्रीरंग खिल्लारे हे अभिवादनसभेत रविवार दि १४ एप्रिल 2024 रोजी केले.
या कार्यक्रमाचे उद्घघाटन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाबासाहेब कांबळे याच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे नेते गोपीनाथराव जोंधळे हे होते यावेळी त्रिशरण पंचशील डॉ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेला सुरुवात झाली विचारपीठावर आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते. रिपाईचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपा प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, संतोष रोडगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे , निवृत्ती कांबळे, परीविक्षाधीन एस.पी. नवदीप अग्रवाल, अहमदपूरचे पोलीस उपाधीक्षक मनीष कल्याणकर, पीएसआय आलापुरे साहेब,प्रा. बालाजी आचार्य, बालाजी आगलावे, राहुल तलवार, राम कांबळे, आवाज बहुजनाचे संपादक शिवाजीराव गायकवाड, पत्रकार भीमराव कांबळे, गणेश मुंडे, मेघराज गायकवाड, अजय भालेराव, बाबासाहेब वाघमारे, सुजित गायकवाड, बाबासाहेब कांबळे, दुगाने सर, श्रीकांत बनसोडे, कलीमोद्दीन अहमद, अशोक सोनकांबळे, चंद्रशेखर भालेराव, प्रकाश भालेराव, शिवाजी भालेराव,अण्णाराव सूर्यवंशी, तांबोळी, रामानंद मुंडे, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, विधीज्ञ अँड भारतभूषण क्षीरसागर, सिनेट सदस्य निखिल कासनाळे , डॉ. संजय वाघंबर, नगरसेवक राहुल शिवपुजे, माधव जाधव, दिगंबर गायकवाड, राजे पाटील, डॉ. बालाजी थिटे, संतोष गायकवाड, संदीप वाघंबर,अजहर बागवान, आशिष तोगरे,वाल्मीक कांबळे, अहमद तांबोळी,प्राचार्य एम बी वाघमारे , दयानंद वाघमारे, दत्तूमामा कांबळे , दिगंबर गायकवाड ,जीवन गायकवाड , शेख खुर्रम, सौ अंजली अरुण वाघंबर,विद्याताई गायकवाड, छायाताई गुळवे, डॉ. रोहिणी कांबळे, शकुंतला बनसोडे, शाहूताई कांबळे, नीलूबाई कांबळे. इत्यादी मान्यवर उपस्थित होते, तत्पूर्वी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी शासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी सौ मंजुषाताई लटपटे व तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी नगरपरिषदेचे शेख मुसाभाई, इंजिनियर चिरके साहेब, पुरी साहेब आणि भदाडे साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, बाबासाहेब कांबळे, शिवानंद हेंगणे, सुजित गायकवाड, सौ. अंजली वाघंबर, शकुंतला बनसोडे, डॉ. रोहिणी कांबळे, आदिनी मनोगत व्यक्त केले तर गोपीनाथराव जोधळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी साठी अरुण भाऊसाहेब वाघंबर, कलीम अहमद , शुभम वाघबर , आदित्य वाघंबर, सचिन गायकवाड, सचिन बनाटे,आकाश व्यवहारे ,बाबुभाई शेख, ऍड, लांडगे, चंद्रकांत कांबळे,आदिनी परिश्रम घेतले, सूत्रसंचालन बाबासाहेब वाघमारे यांनी केले तर आभार सौ अंजली वाघंबर यांनी सर्वांचे मानले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक / उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते.