सिद्धार्थ सोसायटीत महिला मंडळाकडून आंबेडकर जयंती साजरी…..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी दिलेले योगदान फार मोठे – सांगवे
उदगीर (एल.पी. उगिले)
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील कष्टकरी, कर्मचारी, उपेक्षित, शोषित या वर्गासाठी जसे क्रांतिकारक पाऊल टाकत त्यांना विकासाच्या प्रवाहात सामील केले. तशाच पद्धतीने तत्कालीन समाज व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जायचे, ते चित्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्णपणे बदलून स्त्रि आणि पुरुष हे समान आहेत. हे सांगून भारतीय राज्यघटनेत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देऊन खऱ्या अर्थाने महिला मुक्तीची मुहूर्तमेढ रोवली. असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्ती सांगवे यांनी व्यक्त केले. ते सिद्धार्थ सोसायटी येथे महिला मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी संयोजकाच्या वतीने सांगवे परिवाराच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
पुढे बोलताना सांगवे म्हणाले की, राज्यघटना लिहिताना काही लोकांना असे वाटत होते की, स्त्रियांना मतदानाचा अधिकार नको. मात्र बाबासाहेबांनी अट्टाहासाने महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क दिले. तेथूनच महिलांच्या प्रगतीची सुरुवात झाली. असे म्हटले तर वावगे होणार नाही, असेही सांगितले.
या कार्यक्रमासाठी दैवशाला मसुरे, शांताबाई बुकटे, वर्षा दीपक कांबळे, छाया बुक्टे, फुलबाई बाबुराव मादळे, सुमन प्रकाश कांबळे, माया तानाजी बुकटे, वैशाली संतोष घोरपडे, गंगुबाई नवनाथ मोरे, ज्योती रवी कांबळे, चंदन राजू नेत्रगावकर, माया कांबळे, मयुरी सांगवे, बालिका सांगवे, अज्ञानबाई भालेराव, विमलबाई कुंतीकर, सूर्यकला तिकटे, सत्यकला गोडबोले इत्यादी महिलांनी विशेष परिश्रम घेतले.