फुले नगर उदगीर येथे आरोग्य शिबिराचे नियोजन
उदगीर (एल. पी.उगीले)
स्वातंत्र्य,न्याय,समता आणि बंधुतेचा उपदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन फुलेनगर येथे केले होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण जगाला करून दिले जाते, अशा या महामानवास अभिवादन करून आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब सूर्यवंशी,उपाध्यक्ष सुनील गोडबोले, बाबासाहेब वाघमारे,सुनील बकुळे, मनोज चांदेगावकर, दीपक सुळकेकर,अमोल सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तळवेज व मधुर डायबिटीज सुपर स्पेशालिटी चे डॉ. प्रशांत नवटक्के उपस्थित होते. यावेळी भारती डी.बी.आरोग्य शिबीर व्यवस्थापक, पुट्टेवाड टि.बी औषध निर्माते,योगेश गोदाजी लॅब टेक्निशियन,सौ.पाटील एस आर,सौ.खडके एम बी, सौ.फिरंगे एम व्ही,सौ छायाबाई सोनकांबळे , सौ उषा , सौ शारदा डावरे, निकिता कांबळे, सुतार ज्योती इत्यादी उपस्थित होते.तसेच मधुमेहाची व रक्तदाबाची चाचणी बालाजी कुमठे व अंकिता राठोड यांनी केली.