पु अहिल्यादेवीचे यशराज लोहकरे व शैलजा वडेर शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

0
पु अहिल्यादेवीचे यशराज लोहकरे व शैलजा वडेर शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

पु अहिल्यादेवीचे यशराज लोहकरे व शैलजा वडेर शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी सु येथील पु. अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यशराज आनंद लोहकरे आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शैलजा हुलाजी वडेर हे अनुक्रमे पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणेश हाके, संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके,उपाध्यक्षा ॲड मानसी हाके, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, शिक्षण विस्तार अधिकारी शेख मन्नान सर,केंद्र प्रमुख रमाकांत खंदारे आदींनी यशराज लोहकरे व शैलजा वडेर व त्यांच्या पालकांचे अभिनंदन व कौतुक केले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *