महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांच्या प्रचारार्थ जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या गावोगावी काॅर्नर बैठका
अहमदपूर (गोविंद काळे) : देश सुरक्षित राहण्यासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राहणे नितांत गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन अहमदपूर तालुक्यातील अनेक गावात झालेल्या काॅर्नर बैठकीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केले आहे. अहमदपूर तालुक्यातील उन्नी ,जांब,धानोरा, तीर्थ, किनीकदु येथे आज लातूर लोकसभा निवडणूक 2024 चे भारतीय जनता पक्षाचे व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील अनेक गावात भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी काॅर्नर बैठका पार पडल्या. यावेळी सरपंच मनोहर देवकते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पिनु पाटील, वायगावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील,चेअरमन महेश पाटील, तालुका उपाध्यक्ष दत्ता गोरे,सरपंच प्रभाकर वाकडे,नारायण केरले, अनिल कुलकर्णी ,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अण्णाराव पाटील,यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.