सहाय्यक एस पी बी चंद्रकांत रेड्डी यांची धडाकेबाज कामगिरी !! जुगारावर छापेमारी, 74 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 2 कोटी 28 लाख 73 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

0
सहाय्यक एस पी बी चंद्रकांत रेड्डी यांची धडाकेबाज कामगिरी !! जुगारावर छापेमारी, 74 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 2 कोटी 28 लाख 73 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

लातूर (एल.पी.उगीले) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर (चार्ज निलंगा) सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांनी, त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर दिनांक 12/05/2024 रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे औराद शहाजनी यांचे हद्दीतील मौजे तांबाळा शिवारातील एका शेतामध्ये चालणाऱ्या परवानाधारक क्लबमधील जूगारावर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 12/05/2024 रोजी निलंगा तालुक्यातील पोलीस ठाणे औराद शहाजनी हद्दीमधील तांबाळा शिवारात शेतामध्ये जिल्हाधिकारी लातूर यांनी घालून दिलेल्या परवान्यातील नियम व अटीचे उल्लंघन करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शेतात
परवानाधारक क्लबमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. अशा गोपनीय माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर (चार्ज निलंगा) यांनी छापेमारी करून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने 74 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 2 कोटी 28 लाख 73 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे औराद शहाजनी मध्ये नमूद 74 इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चा कलम 4, 5 व भारतीय दंड विधान कलम 188 या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 12/05/2024 रोजी पोलीस ठाणे औराद शहाजनी हद्दीत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर चार्ज निलंगा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस ठाणे औराद शहाजनी, व पोलीस ठाणे चाकूर येथील पोलीस अधिकारी,अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे. पुढील तपास औराद शहाजनी पोलिस करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!