जयवंतराव पाटील मित्र मंडळाने वृक्ष लागवडीच्या माध्यमातून लोक चळवळ उभारली – तहसीलदार बोरगावकर

0
जयवंतराव पाटील मित्र मंडळाने वृक्ष लागवडीच्या माध्यमातून लोक चळवळ उभारली - तहसीलदार बोरगावकर

उदगीर (एल. पी. उगिले) : हरित उदगीर, सुंदर उदगीर हे ब्रीद वाक्य घेऊन जयवंतराव पाटील मित्र मंडळ उदगीर शहरात करत असलेले वृक्षारोपणाचे कार्य निश्चितपणे उल्लेखनीय आहे. तसेच पर्यावरणासाठी वृक्ष लागवड ही एक लोक चळवळ व्हावी. अशा पद्धतीने या राष्ट्रीय कार्यात युवकांचा सहभाग घेऊन प्रेरणादायक कार्य या मित्रमंडळाने चालवले आहेत. याचा आदर्श इतरांनी घ्यावा. असे उद्गार उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी व्यक्त केले आहेत.
उदगीर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून नगरपालिकेपर्यंत वृक्ष लागवडीच्या दरम्यानचे बोलत होते. यापूर्वी जयंतराव पाटील मित्र मंडळ तर्फे बिदर गेट पासून छत्रपती शाहू महाराज चौकापर्यंत वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी गेल्या दोन वर्षापासून जयंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राबवली जात आहे. हे कार्य निश्चित वाखाण्याजोगे आहे. या कार्यात भर पडत आणखी शहरांमध्ये 1111 वृक्षारोपणाचा संकल्प मित्र मंडळाने केला आहे. या वृक्ष लागवडीच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार राम बोरगावकर हे युवकांना मार्गदर्शन करत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या आपल्या भागामध्ये वृक्षाचे प्रमाण हे अतिशय कमी आहे, हे प्रमाण वाढविण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी युवकांनी पुढे येऊन वृक्ष लागवड ही लोक चळवळ बनवणे गरजेचे आहे. तसेच वृक्ष लागवडी सोबत वृक्ष संवर्धनाची जबाबदारी युवकांनी स्वीकारली पाहिजे. असेही राम बोरगावकर यांनी सांगितले.

उदगीर तालुक्यातील महाविद्यालया मार्फत राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय, सेवाभावी संस्था, तालुक्यातील विविध मित्र मंडळ, विविध सामाजिक संघटनेतर्फे उदगीर तालुक्यात वृक्ष लागवडीचे हे अतिशय उत्कृष्ट कार्य जयंतराव पाटील मित्र मंडळाने पुढे येऊन हाती घेणे गरजेचे आहे. प्रशासन सुद्धा या कार्याच्या पाठीशी 100% उभा राहील, असे आश्वासनही याप्रसंगी तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी आता नगर परिषदेचे प्रशासक सुशांत शिंदे यांनीही या कार्याचे कौतुक करून प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष जर नाही दिले तर, येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना दप्तरासोबत ऑक्सिजनचे सिलेंडर सुद्धा पाठीवर घ्यावे लागेल. हे गंभीर चित्र टाळायचे असेल तर प्रत्येकाने जबाबदारी ओळखून वृक्ष लागवड आणि संवर्धनाला वेळ द्यावा. जयंतराव पाटील यांनी हरित उदगीर या संकल्पनेतून राबवत असलेल्या शहरातील वृक्षारोपण उपक्रमाची माहिती सर्वांना दिली. येणाऱ्या काळात उदगीर शहर एक आदर्श शहर निर्माण होईल. असेही यावेळी सुशांत शिंदे यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *