महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर विभागीय बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असुन येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे विज्ञान शाखेत एकूण २०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होते.यापैकी विशेष प्राविण् यासह ४ विद्यार्थी ,प्रथम श्रेणीत ३२ विद्यार्थी व १६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शेकडा निकाल ९८ .५०टक्के असा लागला आहे. दृष्टी माने ८३.६६, अथर्व कजेवाड ८१.५० टक्के,गुंजन रोडे ७९टक्के अनुज केंद्रे ७५.५० टक्के, कला शाखेमधून ५६ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले असून यापैकी २ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शेकडा निकाल९४.६४ टक्के लागला आहे तर क्रॉप सायन्स मधुन पाटील वैष्णवी शिवाजी ७४.८३ टक्के, पाटील अर्जुन शिवाजी ७३.८३ टक्के तसेच विशेष प्राविण्यातील विद्यार्थी शीतल पारेकर ८१.५० टक्के आरती गायकवाड ७५.३३टक्के प्रतिक्षा कांबळे प्रतीक्षा ७४.३३ टक्के एमसीवीसी विभागातून ३५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यापैकी ६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शेकडा निकाल ७७ टक्के लागला आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी. टी .शिंदे, व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य बी.आर. काबरा उप मुख्याध्यापक ए.एस. सूर्यवंशी उच्च माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका एस.एम. शिंदे तसेच उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.