ईश्वराचा प्रसाद म्हणून संसार केल्यास मुक्ती मिळेल – जगदगुरु डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य

0
ईश्वराचा प्रसाद म्हणून संसार केल्यास मुक्ती मिळेल - जगदगुरु डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य

ईश्वराचा प्रसाद म्हणून संसार केल्यास मुक्ती मिळेल - जगदगुरु डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य

उदगीर (एल.पी.उगीले) : ईश्वराने मानवाला सुखभोगण्यासाठी सर्व काही दिले आहे. भोगणारे आपणच आहोत, परंतू माझ म्हणून न भोगता देवाचा प्रसाद म्हणून स्वीकार केला तर संसारातुन मुक्त कोणी शक्य आहे. असे मौलिक विचार काशीपीठाचे जगदगुरु डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले.
उदगीरचे आराध्य दैवत सदगूरु श्री हावगीस्वामी महाराज मंदिरचा जिर्णोध्दार व मंदिराचा सुवर्ण कलशारोहण सोहळा निमित्य श्री गुरु हावगी स्वामी मठाचे मठाधिश शिवाचार्यरत्न ष.ब्र.108 डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्री गुरु हावगी स्वामी महाराज शेतमळा बिदर गेट येथील भव्य जागूत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचा काशीपीठाचे जगदगुरु डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत उपदेशाने झाला.यावेळी व्यासपीठावर डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य, महादेव शिवाचार्य महाराज वाईकर,शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई,सिध्दलिंग महास्वामी देवणी, म.नि.प्र.शिवानंद महास्वामी सायगावकर , सिध्दओमकार शिवाचार्य जंगमवाडी,मुरुगेंद्र स्वामी आदी उपस्थित होते , शिवाचार्य गणसह ना.संजय बनसोडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे,अॅड गुलाब पटवारी, बाधकाम विभागाचे कार्यकारीअभियंता मुकदम,
आदी उपस्थित होते
प्रारंभी सुवर्णकळस सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान देणार्‍या शिव किर्तनकार,प्रवचनकार,भजनी मंडळ, पौरहित्य मंडळ,महिला भजनी मंडळ आदींचा मंदिर समितीच्या वतीने जगदगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी डाॅ शंभुलिंग शिवाचार्य महाराजानी श्री गुरु हावगीस्वामी मंदिर सुवर्ण कळसारोहण सोहळा यशस्वी करणारे शिवाचार्य, शिवकिर्तणकार मंडळ, प्रवचनकार, महिला भजनी मंडळ, हावगीस्वामी युवक मंडळ यांचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *