अहमदपूर येथे तथागत बुद्ध पोर्णिमेनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : आज देशांमध्ये अज्ञान आणि अंधश्रद्धे मध्ये वाढ झाली आहे यामुळे देशापुढे अनेक जटील समस्या निर्माण झाल्या असून मनुष्याचे जीवन अधोगतीकडे जात आहे ही परिस्थिती बदलायची असेल तर धम्मशिवाय पर्याय नाही कारण धम्म म्हणजे विज्ञान ,बुद्धिवाद आणि नीतिमता होय तसेच धम्माचे आचरण म्हणजे खरी राष्ट्रभक्ती होय असे प्रतिपादन प्रा बालाजी आचार्य यांनी वैशाख पौर्णिमेनिमित्त तथागत सम्यक समबुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तथागत बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करताना केले
अहमदपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ, अरुणभाऊ भाऊसाहेब वाघंबर आयोजित तथागत बुद्ध यांची २५६८ वी जयंती अति उत्साहात संपन्न करण्यात आली यावेळी प्रा आचार्य बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे लातूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे आमदार बाबासाहेब पाटील, प्रमुख मार्गदर्शक प्रा बालाजी आचार्य,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, महेश अर्बन बॅकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, सामाजिक नेते दयानंद वाघमारे, धम्मउपासक शेषराव ससाने, चाकूरचे प्रथम नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे , सामाजिक नेते प्रकाश फुलारी ,प्रभाकर गायकवाड ,नागसेन महालिंगे मयूर कांबळे, संदीप महालिंगे, सुर्यकांत कोकाटे , भाजपाचे गोविंदराव गिरी ,पञकार बाबासाहेब वाघमारे ,त्रिशरण मोहगावकर, भीमराव कांबळे आयोजक अरुणभाऊ भाऊसाहेब वाघंबर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तथागत बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करून आ बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर त्रिशरण ,पंचशील ग्रहण करून महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी आ बाबासाहेब पाटील यांनी सम्यक शुभेच्छा देताना बुद्धाचे तत्त्वज्ञान सर्वांसाठी उपयुक्त आहे असे सांगून बुद्ध पौर्णिमेच्या सदिच्छा दिल्या यावेळी प्रा बालाजी आचार्य पुढे बोलताना म्हणाले की प्रज्ञा ,शील करुणेची आणि सदाचरणाची शिकवण देऊन कर्म सिद्धांत द्वारे मानवाला दुःखमुक्तीचा मार्ग तथागताने दाखविला त्या मार्गाचे अनुसरण केले तर आपले जीवन समृद्ध होईल असे सांगून राष्ट्राच्या उभारणीत धम्माचे अनन्य साधारण असे महत्व आहे असे ही म्हणाले तत्पूर्वी अरुणभाऊ वाघंबर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद वाघमारे यांनी केले तर आभार सचिन गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेब वाघमारे, शुभम वाघंबर ,आकाश व्यवहारे, बाबुभाई शेख , अंजलीताई वाघंबर, मुन्ना पठाण, चॉद शेख शकुंतला बनसोडे, रसिका बनसोडे, नगर परिषदेचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.