देवणी शहरात दुषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

0
देवणी शहरात दुषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

देवणी शहरात दुषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

देवणी (प्रतिनिधी) : सध्या देवणी शहरात दुषित व दर्गंधी युक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळें नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, याबाबत प्रशासनाने सवच्छ व नियमित पाण्याचा पुरवठा करावा याबाबतचे निवेदन नगर पंचायतिला देण्यात आले आहे, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तहसीलदार गजानन शिंदे यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिले आहेत, याबाबत नगर पंचायत कडून मिळालेली माहिती अशी की, शहरात टाकलेली पाईप लाईन ही खूप जुनी असल्याने जागोजागी गळतीचे प्रमाण वाढले आहे, नळाला तोट्या नसल्यामुळे सांडपाणी व गटाराचे दुषित पाणी पाइप लाइन द्वारे नागरिकांना पुरवठा होत असल्याचे डॉ घोरपडे यांनी सांगितले, वास्तविक पणे प्रभाग क्रमांक 15 व 16 या भागात मागास वर्गीय व मुस्लिम समाज असल्यामुळें नियमीत पाणी पुरवठा नाहीच, महिन्यात केवळ दोन वेळा व ते पण एक तास पाणी पुरवठा होत आहे शहराच्या अन्य भागात दोन दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो, सार्वजनिक पाणी पुरवठा याशिवाय बोअर वेलच्या माध्यमातून सवछ पाण्याचा पुरवठा केला जातो, इतर प्रभागाच्या तुलनेत प्रभाग क्रमांक 15 व 16 मध्ये एक प्रकारचा आण्याय होत आहे, विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक 15 मधून नगराध्यक्षा या निवडून आलेल्या आहेत,दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्या बाबत संबधित वर्डाच्या नगर सेवकाला तोंडी कल्पना दिली होती तरी त्यामध्ये कोणतीही पाईप लाईन ची दुरुस्ती केली गेली नाही यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दुषित व दुर्गंधी युक्त पाण्या मुळे संडास उलट्या होणे आता सर्व सामान्य झाले आहे याबाबत नगर पांचयतेने तातडीने दखल घेऊन स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी प्रभाग क्रमांक 15 व 16 मधिल नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसात यामध्ये कुठलाही बदल अथवा दुरुस्ती हाती घेतली नाही तर नगर पंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *