वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठामुळे नागरिक हैराण
लातूर (दयानंद स्वामी) : एकीकडे उकाडा वाढला असून अंगाची लाही लाही होत असताना लातूर मध्ये बादाडे नगर या भागात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.त्यामुळे बादाडे नगर भागातील नागरिकांचे उकाड्यामुळे हाल होत आहेत.मात्र तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा बंद करावा लागत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.बादाडे नगर परिसरात सध्या वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.कोणतेही कारण न देता बादाडे नगर येथील वीजप्रवाह वारंवार खंडित करण्याचे प्रकार सुरू आहेत.तसेच यांचा फटका नागरिकांसह व्यावसायिकांना बसत आहे.ऐन रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ज्येष्ठांसह नागरिकांची झोपमोड होते आहे.आठवड्यातून एकदा देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात असताना,इतर दिवशीही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्या अगोदरच ही परिस्थिती आहे तर पावसाळा सुरू झाल्यावर काय होणार याच विवंचनेत सध्या बादाडे नगर भागातील नागरिक आहेत.महावितरणकडे फोन करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून अवेळी वीज जाण्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.उन्हाळा असल्याने सूर्य आग ओकत आहे.पाण्याची पातळी खालावत आहे.अती जास्त उष्म्याने अंगाची लाही लाही होत असताना अशातच दिवस दिवस वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.यात मुख्यत्वेकरून दुपारी व रात्री वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून,वीज खंडित होत असल्याने महिलांना पिण्याचे पाणी.घरातील वीजेवर अवलंबून असणाऱ्या कामांचा खेळ खंडोबा होत आहे.