संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचा 100% टक्के निकाल

0
संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचा 100% टक्के निकाल

संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचा 100% टक्के निकाल

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100% टक्के लागला असून परीक्षार्थी 37 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत 21 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जायभाये साईनाथ या विद्यार्थ्यांनी 92.80% गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला तर भगत वैष्णवी हिने 90% गुण घेऊन द्वितीय आली. आणि कोकणे निवेदिता 89% टक्के गुण घेऊन विद्यालयातून तृतीय येण्याचा मान मिळविला तसेच विद्यालयातून केंद्रे प्रतीक्षा 82.40%, कांबळे अंजली 81.60%, शेख मुस्कान 80.40%, परतवाघ आर्या 79.60%, शिंदे संगम 79.20%, लांडगे श्रुती 78.20%, पवार हानमंत 77.80%, रमेश सुरनर 76.80%, गोरे कैलास 74.80, गुण मिळविले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश दादा हाके पाटील, संस्था सचिव रेखाताई हाके पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. या गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी तोवर , मुख्याध्यापिका आशाताई रोडगे यांनी अभिनंदन केले आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बुरगे सुजाता मॅडम आबंदे संगीता मॅडम, जांभळदरे अर्चना मॅडम, चव्हाण ज्ञानेश्वर सर, युवराज मोरे सर आणि भास्कर दिंडे सर यांनी केले सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!