धनेगांव ता देवणी येथील विजपुरवठा सुरळीत करा अन्यथा तिव्र आंदोलन करु – भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे

0
धनेगांव ता देवणी येथील विजपुरवठा सुरळीत करा अन्यथा तिव्र आंदोलन करु - भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

धनेगांव ता देवणी येथे वंलाडी येथील उपकेद्रावरुन विद्युत पुरवठा केला जातो, वारवांर विज पूरवठा वारवांर खंडित केला जात आहे,थोड्या प्रमाणात वार वादळ ,पाऊस आला की , विज खंडित होत आहे,रोजच्या या विजेच्या लंपडावामूळे नागरिक व ग्रामस्थ ञस्त आहेत,ऊन्हाळ्याचे दिवस आहेत गावात विद्युत पुरवठा खंडित असल्यामूळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आहे त्यामूळे पाणी असूनही विजे अभावी ग्रामस्थांची खुप गैरसोय होत आहे, व तसेच धनेगांव ट्रान्सफार्मर हे गेली दहा दिवसापासून नादुरुस्त आहे ते तात्काळ चालु करावे, व सदरील ट्रान्सफार्मर हे 3:15 M.V.A असुन त्याऐवजी 5. M.V.A चा ट्रान्सफार्मर बसवण्यात यावा व तसेच गावठाण हद्दीमध्ये नविन दोन 63 K.V.M चे रोहिञ व गावअंर्तगत साठी वाढीव वस्ती येथे नविन पोल व लाईनमॅन हे वारवार गैरहजर राहतात त्यांना सुचना करुन ते तात्काळ पदस्थापना असलेल्या गावी रोज उपस्थित राहवे,
व धनेगांव व हेंळब येथे एबीसी स्विच बसवुन धनेगांव व हेंळब ही गावें वेगवेगळी करावे व पाऊसाळा जवळ आल्यामूळे धनेगांव गावठाण हद्दीतील सर्व विद्युत पुरवठा करणार्‍या पोल व वाॅयरचे मेन्टनस करुन ट्री कटिंग करुन रोज गुल होणार्‍या लाईटपासुन व नागरिकाची गैरसोय होणारी तात्काळ दुर करावी व येणार्‍या दोन दिवसात सदरील विज पुरवठा सुरळीत नाही झाला तर भाजयुमो पध्दतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी असे निवेदनात म्हणले आहे यावेळी,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष तथा उप-संरपच रामलिंग शेरे ,चेअरमन श्री संगाप्पा चरपले, श्री जंयत पाटील बाळासाहेब बिरादार,श्री राजकूमार बिरादार ,संगमेश्वर शेटकार , श्री विठ्ठल बोयणे यादीच्या निवेदनावरती स्वाक्षरी करण्यात आली

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *