उदयगिरी अकॅडमीची SSC बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील अग्रगण्य शैक्षणिक चळवळ उदयगिरी अकॅडमीतील संकेत कमलापुरे या विद्यार्थ्याने 100% गुण मिळवून लाल बहादूर शास्त्री शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे, तसेच माधव जाधव(99.80%), सायली सावळे (99.40%),पार्थ केंद्रे (99.40%), अंकिता खांडेकर (99.20%), प्रिया गायकवाड (99%), गायत्री गव्हाणे (99%), रोहन पाटील (98.80%), सिद्धेश्वर जायभाये (98.40%), सिद्धारामेश्वर वडले (98.20%), श्रेयस आचार्य (98%), अथर्व धोंगडे (98%), अमित बिरादार (98%) अश्या एकूण 31 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा अधिक गुण व 49 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. गणितात 100 पैकी 100 घेणारे 2 विद्यार्थी तर 100 पैकी 99 गुण घेणारे 8 विद्यार्थी , विज्ञान विषयामध्ये 100 पैकी 100 घेणारा 1 तर 100 पैकी 99 गुण घेणारे 3 विद्यार्थी, इंग्रजीत 100 पैकी 98 व 97 घेणारे 3 तर संस्कृतमधे 100 पैकी 100 घेणारे 9 विद्यार्थी आहेत.
या सर्व गुणवंतांचा सत्कार प्रमुख पाहुणे प्रा.शिवराज अंबूलगे, प्रा. देवीदास खिंडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा. संतोष पाटील, प्रा.डॉ. धनंजय पाटील, प्रा. ज्योती खिंडे, प्रा.मीनाताई हुरदळे, प्रा. श्रीगण रेड्डी, प्रा.नंदिनी नीटूरे, प्रा. निवेदिता भंडारे ,प्रा.गोविंद केंद्रे आदींनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा फेटे बांधुन सत्कार करण्यात आला.