श्यामलाल हायस्कूलच्या उज्वल यशाची परंपरा कायम

0
श्यामलाल हायस्कूलच्या उज्वल यशाची परंपरा कायम

श्यामलाल हायस्कूलच्या उज्वल यशाची परंपरा कायम

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था संचलित श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चा इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल 99.03% लागला आहे. शैक्षणिक क्षेत्रात मागील सात दशकाहून अधिक काळापासून आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा ठसा श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था नोंदवित आहे.
निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम राखत श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चा 99.03% निकाल लागला आहे.
शाळेतून सोनटक्के बाजीराव संजय 100% गुण घेऊन सर्वप्रथम आला आहे, तर द्वितीय क्रमांकावर ढगे रागिणी प्रदिप 99.80% तर तृतीय क्रमांकावर विश्वनाथे आकांक्षा महादेव 99.20% गुण घेऊन यश संपादन केले आहे.
शाळेतून विशेष प्राविण्यासह 110 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर प्रथम श्रेणी मध्ये 66 विद्यार्थी आले आहेत,
द्वितीय श्रेणी मध्ये 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक बालाजी चव्हाण , प्रभारी पर्यवेक्षक राहूल लिमये, पालक बंधू, भगिनीचे संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणिजी आर्य, उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर, सचिव ऍड. विक्रमजी संकाये, सहसचिव श्रीमती अंजुमणी आर्य,शिक्षक पालक संघाच्या अश्विनी जाधव यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या निमित्ताने संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी सर्व विद्यार्थी व पालक बंधू, भगिनी यांचे अभिनंदन केले व यापुढे उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मार्ग आपल्यासाठी खुले आहेत., विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे यशाचे शिखरे पादाक्रांत करावीत व राष्ट्रभक्ती, देश हित डोळ्यासमोर ठेवून भारत देशाचा भक्कम आधारस्तंभ म्हणून नावलौकिक प्राप्त करावा आणि आपल्या आई-वडिलांच्या इच्छा-अपेक्षा पूर्ण कराव्यात, असा सदिच्छा संदेश दिला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *